नवीन नांदेड| गोदावरी नदीच्या पाण्याचा पात्रत वाढ झाल्याने विष्णुपूरी येथील जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या अनेक स्मशान भुमित चोहोबाजूंनी पाण्याने घेरल्याने नावामनपाचा सिडको येथील स्मशान भुमित शहरातील व परिसरातील मृत पावलेल्या जवळपास सहा महिला पुरूष यांच्या वर २ व ३ सप्टेंबर रोजीअंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
नावामनपाचा हद्दीत असलेल्या व नदीकाठच्या लगत असलेल्या शांतीधाम,शनिघाट,जुना कौठा,वसरणी मरघाट चौफाळा, व शहरातील अनेक भागात नदीकाठी असलेल्या स्मशान भुमीत शहरी व ग्रामीण भागातील मृत्यू पावलेल्या मयतवार अंत्यसंस्कार करण्यात येत होते, परंतु गेल्या दोन दिवसापासून गोदावरी नदीला वाढलेल्या पाण्यामुळे जवळपास सर्वच स्मशान भुमी पाण्याखाली गेल्याने सिडको येथील स्मशानभुमित २ व ३ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यात तिन पुरुष,तिन महिलांचा समावेश एका मृत ईसमावर दफन करून अंत्यसंस्कार केले असल्याचे रखवालदार बालाजी गोविंदराव पवार यांनी माहिती दिली आहे. नांदेड शहरातील गोदावरी नदीला पूर आल्यानंतर सिडको स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात येत असत याही वर्षी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत, त्यामुळे या परिसरात मृत नातेवाईक यांच्यी गर्दी स्मशान भुमी परिसरात झाली आहे.