नांदेड| अज्ञात कारणावरून भायेगाव येथील ड्रायव्हर ओमंकार रमेश कोल्हे यांना धारदार हत्याराने डावीकडील छातीवर मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची घटना नांदेड हैदराबाद रोडवरील भायेगाव पाटी पासून कॅनाल पुलाच्या जवळील ५० मिटर पुर्वेस घडली असून घटनास्थळी गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर तात्काळ नातेवाईक यांनी रूग्णालयात दाखल केले,घटनास्थळी दुचाकी व रक्त पडले होते, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण पोलीस स्टेशन व शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे गर्दी केली होती, या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानक अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,फिर्यादी रमेश नानासाहेब कोल्हे वडील यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये २४ आगस्ट रोजी रात्री आम्ही सर्वजण जेवण केले तेव्हा माझा लहान मुलगा ओमकार कोल्हे हा माझा मोबाईल घेऊन बाहेर गेला, दि २५ आगस्ट रोजी सकाळी ५.४५ दरम्यान माझा पुतण्या राम त्रिंबक कोल्हे यांनी त्यांच्या आईस सांगितले कि, ओमंकार रमेश कोल्हे हा भायेगाव पाटी जवळ जखमी अवस्थेत पडलेला आहे, रामाचा आईने सांगितल्याने घटनास्थळी धाव घेतली, मुलगा ओमकार यास छातीवर डावीकडे धारदार हत्याराने मारल्याची जखम होती, व जमीनीवर व अंगास लागले होते, जखमी दुचाकी वरून शासकीय रुग्णालयात विष्णुपूरी येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.


२४ आगस्ट रोजी रात्री ११ वाजता ते २५ आगस्ट रोजी सकाळी ५.४५ वाजता सुमारास भायेगाव पाटी बसस्थानक कॅनाल जवळ हैदराबाद रोडवरील भायेगाव ता. जि. नांदेड येथील येथील ओमंकार रमेश कोल्हे व्यवसाय ड्रायव्हर वय वर्षे 27 रा. यांच्या छातीतील बरगाडीत अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने मारून गंभीर जखमी करून जिव ठार मारले आशी तक्रार दिली.


घटनेची तात्काळ दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे, पोलीस अमलंदार किरण ऊदावंत यांनी घटनास्थळ पंचनामा केला , गुन्हे शोध पथकाचे पथक उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस अमलंदार विक्रम वाकडे, शेख सत्तार,माधव माने ,ज्ञानेशवर कलंधर , मारोती पंचलिंग व नांदेड स्थानिक गुन्हे व उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक या चार पथका मार्फत घटनेतील आरोपीचा शोध चालु असुन मयताचे शव शवविच्छेदन शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे केले असून , घटनास्थळ पंचनामा करून आरोपी शोध घेण्यासाठी शोध पथक रवाना झाले आहे.

गावातील ग्रामपंचायत कार्यालय सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, अशोक पाटील खोसडे ,उपसरपंच बालाजी कोल्हे ,भानुदास कोल्हे,ऊतराम कोल्हे, त्रिंबक पाटील कोल्हे व ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस पाटील प्रतिनिधी शिवानंद पाटील खोसडे यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केले. या प्रकरणी कलम १०३ (१) ४,२५,नुसार अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नागनाथ आयला ने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे हे अधिक तपास करत आहेत.


