नवीन नांदेड। शारदा भवन शिक्षण संस्था संचलित,इंदिरा गाधी हायस्कूल हडको येथील सहशिक्षक ओकांर सुधाकर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया,कोल्हापूर यांच्या वतीने गेल्या १७ वर्षापासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २४ जाहीर झाला असल्याचे निवड समिती सचिव दिलीप मोरे यांनी कळविले असून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
अविष्कार फाऊंडेशन इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो,राज्यातील विविध जिल्ह्यातील शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षंकाची निवड करण्यात येते, या वर्षी सदरील पुरस्कार वितरण कुणबी भवन निजामपूर रोड मानगाव जिल्हा रायगड येथे २२ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथील सहशिक्षक ओकांर अंबुलगेकर यांनी शैक्षणिक कार्यात उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला आसल्याचे जिल्हा निवड सचिव दिलीप मोरे यांनी कळविले आहे.
पुरस्कार मिळाल्या बद्दल इंदिरा गांधीं हायस्कूल येथे मुख्याध्यापक जि. एम. शिंदे,पर्यवेक्षक कोल्हेवाड, गौकुळवाळे आर.एस,जेष्ठ शिक्षक अण्णा गरड, किशनराव येवते, सखाराम गजले,अमर बयास,वसंत शिंदे,संजय साखरे, व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत करून सत्कार केला.