हिमायतनगर। येथे १९९४ ची बॅच इयत्ता बारावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी तब्बल ३० वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत एक मेकांच्ची ख्याली, खुशाली जाणून घेतली. परमेश्वर मंदिर सभागृहात हा जुन्या विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.
१९ ९४ मध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यानी गेट टुगेदरची संकल्पना मांडली. तिस वर्षाचा प्रदीर्घ प्रवास करून एकत्र आलेल्या विद्यार्थाचा स्नेह मेळावा अगदी खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला. तेव्हाची विद्यालयाची परिस्थिती व विद्यार्थ्याची गुणवत्ता व तेव्हाचे शिक्षण या वर दिलखुलास चर्चा करून या भव्य दिव्य स्नेह मेळाव्याचा आनंद माजी विद्यार्थ्यानी घेतला. व तसेच काही विद्यार्थ्यानी आपल्या अंगभूत कलेचा अविष्कार उपस्थितांना दाखविला. आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी एकमेकास माहीती देवून सांगोपांग चर्चा करण्यात आली.
या स्नेह मेळाव्यात हुजपा च्या सेवानिवृत्त प्राचार्या ल. दी. व्यवहारे, प्रा. भुरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. व तसेच स्नेह भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रामदिनवार यांनी करून अभार मानले.
या वेळी प्रा. जाधव, प्रा. डोईफोडे, प्रा. मुगटकर, प्रा. सुदगीरवार, गाडगेराव, मुधोळकर, अशोक, विठ्ठल, अजय जोगी, मैथिली पाध्ये, मोहन नाईक, साधना उत्तरवार, महेश मारुडवार, उज्वला पांचाळ, मनोज मादसवार, शेख न्हणु, रहेमत शेख, श्रीकृष्ण चिंतावार , संदीप चेलमेलवार, राजू तोटेवाड, गोपाल नपते, मुन्ना मारूडवार, गणेश पार्डीकर, आदींसह माजी विद्यार्थ्याची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.