हदगाव, शे.चांदपाशा| हिगोली लोकसभाची निवडणूक संपताच हदगाव नगरपरिषदेला शासनाच्या एका पञाद्वरे जाहीर झालेला ८५ लाखाचा निधी लोकसभेच निवडणूकीचा निकाल लागताच काही आठवड्यातच हिगोली नगरपराषदेला वर्ग करण्यात आल्याचा पञ शासनाच्या उपसचिव कडुन हदगाव नगरपरिषद कार्यालयाला प्राप्त झाल्याची विश्वासनिय माहीती मिळालेली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार राज्याच्या नगरविकास विभाग कडून दि ११ जुन २०२४ ला शासनाने जारि केलेल्या शुद्ध पञकात म्हटले आहे की, हदगाव नगरपराषदे करिता ‘वैशिष्टयपुर्ण योजने अतर्गत ०.८५ कोटी विशेष अनुदान देण्यात आलेले होते परंतु ह्या कामाकरिता कार्यारंभ आदेश दिला नसल्याने सदर कामे रद्द करुन सदर कामाचा निधी हिगोली नगरपरिषदेच्या विविध कामाकरिता या निधीला मान्यता देण्यात येत असल्याच उपसचिव श्रिकांन्त आंडगे (उपसचिव महाराष्ट्र शासन) याच्या सहीनिशी पञ हदगाव नगरपरिषदेला देण्यात आलेल आहे.
लाख की कोटी शासनाच्या पञामुळे संभ्रम..?
राज्याच्या नगरविकास मंञ्यालयाकडुन दि ११जून २०२४ रोजी जारी केलेल्या पञात हदगाव नगरपरिषदेला वैशिष्ट्ये योजनेअतर्गत ०.८५ कोटीच म्हटलेल आहे जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने न.पा प्रशासनाशी संपर्क साधला आसता कोटी नव्हे ०.८५लाख रुपये असल्याची माहीती मिळाली. नेमके लाख की कोटी या पञामुळे सभ्रम निर्माण होत आहे. यावरुन शासनाच कारभार सुरु असल्याच दिसुन येते.
…तरी आमदार गप्प कसे…?
राज्याशासनाचे नगरविकास मञालयाद्वरे दि ११जून २०२४ ला राज्याचे उपसचिव पञ जारी करुन हदगाव नगरपरिषदचा तो निधी हिगोली नगरपरिषदेला वळविला तरी येथील विद्यमान आमदाराना मंञी याना सहज भेटतात. मात्र या बाबतीत विचारपूस केली नाही का..? राज्याचे उपसचिव नादेड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायताचा निधी हिगोली जिल्ह्यातील नगरपरिषदेला वळवितात त्याची पुसटशी कल्पना जिल्ह्यातील आमदाराना लागत नाही. अणखी विशेष म्हणजे आगामी निवडणूकसाठी फिर से शिवसेनेचे (शिदेगट) चे बाबुराव कदम कोहळीकर हे हदगाव विधानसभा लढविणार असल्याचे दाखले त्यांचे कार्यकर्ते देत आहेत. या बाबतीत त्याचेशी संपर्क साधला असता ते पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याच त्यांच्या फोनवरुन आवाज येतो …
माजी खा.हेमत पाटील याच्या नाराजीचा तर परिणाम नव्हे…?
हिगोली लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजी खा. हेमत पाटील यांच्या माध्यमातुन कोट्यावधी रुपयाचा निधी हदगाव विधानसभा क्षेञात आलेला असतांना त्यामध्ये हदगाव नगरपरिषदेला भरघोस निधी मंजुर झाला होता. या पुर्वी काही राजकीय जोडे उचलत गुत्तेदारी करणार्यांनी दुस-याचे नावे असलेली कामे बोगस पद्धतीने केल्याने हदगाव नगरपरिषद बदनाम झालेली आहे. असे असतांना आता लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आलेला निधी दुर्लक्षित असलेल्या प्रभागात उगाच वापर होईल. अशी अपेक्षा नागरिक करित असतांना माञ अचानक हा मंजुर झालेल निधी काहीतरी प्रशासकीय स्तरावर काही तरी तांत्रिक अडचण दाखवून हिगोली नगरपरिषदेला वळविण्यात आल्याने माञ हदगाव नगरवासीयाच माञ अपेक्षा भंग झाल्या आहेत. एकमेव कारण म्हणजे माजी खा हेमत पाटील यांची हिगोली लोकसभा निवडणूकीच्या वेळी नाकरण्यात आलेली उमेदवारी अशी चर्चा सध्या तरी हदगाव विधानसभाक्षेञात चर्चिल्या जात आहे.