कंधार, सचिन मोरे। कंधार तालुक्यातील कौठा येथील कृषी व्यापारी गजानन येरावार यांच्या घरावर पडलेल्या धाडसी दरोड्यात लाखो रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी पळविला. या घटनेनंतर सदरील व्यापारी व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव भयभीत झाले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व आर्य वैश्य समाजाच्या असंख्य बांधवांनी रविवारी दिनांक 16 जून रोजी येरावार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना धीर दिला. या संदर्भात दरोडेखोरांना 48 तासात अटक करावी अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कंधार येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून या प्रकरणाचा छडा लावावा असे विनंती करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी संपूर्ण कौठा गाव बंद पुकारून निषेध करण्यात आला या संदर्भात शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या हाकेला जिल्हा व राज्यातील असंख्य समाज बांधव रविवारी सकाळी कौठा येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 48 तासात आरोपीला अटक झाली नाही. तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, राज्य कार्यकारणी सह सचिव सदानंद मेडेवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, उत्तम चौधरी, राम पत्तेवार, पवन गादेवार, अशोक मामीडवार, नरसिंग मुक्कावार ,अनिल नगनूरवार, साईनाथ मेडेवार, विजय महाजन, अनिल वट्टमवार, विक्रम गोविंदवार, पंडित वट्टमवार, तुकाराम तगडपल्लेवार, ज्ञानेश्वर कोत्तावार, सरपंच शिवराज देशमुख, सुभाष उपलंचवार, भानुदास येरावार, सतीश देशमुख, राजेश पावडे, भुजंग बिडवई, शंकर वट्टमवार, किशन कंधारे, रुपेश येरावार, प्रताप देशमुख, साईनाथ महाजन, महेश तांडूरवार, लक्ष्मण गंगावार, चंद्रकांत पाळेकर, अक्षय जवाद्वार, विशाल पापीनवार, धनंजय कवटिकवार, बालाजी पालीमकर, नागेश बोरलेपवार, अनिल सिरमवार, स्वप्निल बासटवार, विशाल नारलावार, सागर मुखेडकर, संदीप बंडेवार, संतोष जकाळपुरे, संदीप बंदेवार, प्रा.अनिल मुगटकर, वसमत यांच्यासह आर्य वैश्य समाजातील असंख्य बांधव गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी उपस्थित होते.