नांदेड| विष्णुपुरी येथील गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे संतां ची सालाना बरसी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वारा चे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी, लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरिंदरसिंघ जी कारसेवावाले व संत बाबा बलविंदरसिंघ जी कारसेवावाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महान कारसेवक सचखंडवासी संत बाबा दलीपसिंघ जी ,सचखंडवासी संत बाबा जीवनसिंघजी, सचखंडवासी संत बाबा हरिसिंघ जी आणि सचखंडवासी संत बाबा शीशासिंघ जी कारसेवा वाले यांची सालाना बरसी श्रद्धेने साजरी करण्यात आली. या शुभप्रसंगी श्री अखंड पाठ,संत, थोर सद्गुणी व रागी सज्जन कीर्तन व प्रवचन झाले. वाजेगव ते शिकारघाट, शिकारघाट ते हिरा घाट आणि विद्यापीठ ते रतनगड पर्यंतचा रस्ता आणि शिकारघाट येथील गोदावरी नदी वरील पुल संत बाबा दलीपसिंघ जी ,संत बाबा जीवनसिंघ जी यांनी कारसेवा मार्फत केलेला आहे. संत बाबा हरिसिंघ जी आणि संत बाबा शिशासिंघ जी यांची हि कारसेवा महान असून आम्हाला मार्गदर्शक ठरत आहे,त्यांनी सुरू केलेली कार सेवा निरंतर चालू राहणार आहे असे संत बाबा नरेंद्रसिंघ जी यांनी सांगितले.
यावेळी सचखंड गुरुद्वारा चे मित जत्थेदार बाबा ज्योतींदर सिंघ, डॉ.रजिंदरसिंघ,माता साहेब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा तेजासिंघ,नानक झिरा गुरुद्वारा चे जत्थेदर बाबा हरपालसिंघ, बाबा गुरुमितसिंघ, बाबा निर्मलसिंघ जी रणधावा,गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार आर डी सिंघ,सुखविंदर सिंग हुंदल, थानसिंघ बुंगई, रवींद्र सिंघ बुंगई, सरदार बिल्लु मिस्त्री,सरपंच जोरावरसिंघ जौनपुर,शरण सिंघ सोडी, कश्मीरसिंघ भट्टी,बलजितसिंघ धिल्ल्हो यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुद्वारा श्री नानकसार साहिब विष्णुपुरी चे जत्थेदार बाबा सुखविंदरसिंघ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.