नांदेड/धर्माबाद| हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ च्या दहावी उत्तीर्ण बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन ५० वर्षानंतर धर्माबाद येथे २८ व २९ सप्टेंबर रोजी माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
१९७४ ला हुतात्मा पानसरे हायस्कूलमधून दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तब्बल ५० वर्षानंतर स्नेहमिलन आयोजित करण्यात आले आहे. हा अभूतपूर्व योग त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. ५० वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्रित येणार असून, दहावीच्या अ,ब,क तुकडीतील १९७४ चे १०६ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ७० विद्यार्थी या स्नेहसंमेलनात उपस्थित राहणार आहेत.
हा अभूतपूर्व योग अनेक वर्षानंतर जुळून येत असून, त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी व संवाद व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व वर्गमित्र परिश्रम घेत असून, या कार्यक्रमाची जोरदार तयारी सर्व वर्गमित्रांनी सुरु केली आहे. ५० वर्षानंतर या सर्वांच्या एकत्रित भेटी होणार असल्याने मित्र परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.