श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| विद्यार्थ्यांचे शालेय जीवन हे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असतात. कालांतराने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटा धराव्या लागतात आणि आपले आवडते शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर जावे लागते. पुन्हा कधीतरी ते शिक्षक, मित्र, मैत्रिणी भेटतील की नाही, याची शाश्वती पण नसतेः मात्र माहूर शहरातील श्री जगदंबा हायस्कूल च्या शाळेत १९९६/९७ मध्ये दहावीत शिकणाऱ्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल २७ वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली आणि या अविस्मरणीय आणि भावनिकक्षणांचे साक्षीदार झालेत.
माहूर येथील कपिलेश्वर धर्म शाळेच्या सभागृहात दि १५ मार्च रोजी या अनोख्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.


सेवानिवृत्त प्राचार्य मराठीचे शिक्षक अरूण कोरटकर. यांनी या स्नेहसंमेलनाचे यथोचित उद्घाटन केले.यावेळी बाबा गोडसे सर, अचकुलवार सर, राठोड सर, अशोक दवने सर, नागोरावजी गोडसे सर, बनारसे सर, मुनेश्वर मॅडम, वडस्कर मॅडम( सर्व सेवानिवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व उपस्थिती शिक्षकांचा शाल-श्रीफळ, हार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थिती शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून काही शालेय जिवनातून गमतीदार बाबींना उजाळा दिला. यावेळी विद्यादान करणाऱ्या सर्व गुरुजनांचे पूजन करण्यात आले.

या सोहळ्या करीता माजी विद्यार्थी अल्का कदम, नलीनी कदम, अल्फा पटेल, सत्वशिला शेळके, अरूणा बंडाळे, नितु पाटील, रेणुका फड, आदि मुलींची आपल्या सहपरिवारासह उपस्थिती होती , तर राजु राठोड, भुजंग राठोड, सचिन साबळे, अजय दिक्षीत, अजमद खान पठाण, विष्णु रेड्डी. श्रीपाद वाघ, विजय दुधे. सूशिल आमले (शिक्षक), डॉ.उदय भलगे एम डि, रितेश दुबे, रमेश आडे, विक्रम राठोड या सह जवळपास ६५ ते ७० विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते. अमोल भास्करवार, इमरान सुरैया, जगदिश वडस्कर, बालाजी वाघमारे, अनंता मुदगले, अतिष जयस्वाल, प्रशांत सुर्यवंशी, नागनाथ पवार, नबी साहब, लखन जाधव (शिक्षक), उमेश सावळकर आदिंनी हा कार्यक्रम घडवून आनण्या करीता मेहनत घेतली.

एका वर्गात शिकण घेऊन आजरोजी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी परिचय देत विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करत जुन्या आठवणी ला उजाळा दिला.सोबत शिकलेले काही विद्यार्थी मित्र व शिक्षक मृत पावले त्यांना पसायदान घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गुरुजनांनी या स्नेहसंमेलनाच्या आयोजनाचे कौतुक करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार व्यक्त केले.
