लोहा| शालेय जीवनात दहावी हा टप्पा महत्वाचा असतो. पुढील काळात आपण काय करणार आहोत याचे ध्येय निश्चित करावे लागेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत आणि स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला मेहनतीची जोड दिली पाहिजे असे मार्गदर्शन लोहा येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर प्रीतम थोरात यांनी केले.


लोहा शहरातील शिवछत्रपती विद्यालयात इयता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप व परीक्षा शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहा एसबीआय शाखेचे व्यवस्थापक प्रीतम थोरात , संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, हे होते.

प्रमुख मार्गदर्शक श्री थोरात यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला , स्पर्धा ही ग्रामीण -शहरी अशी असते. त्यामुळे मुंबई -पुणे या विद्यार्थ्यांशी सुद्धा होणार आहे तेव्हा आपण स्पर्धेत टाकले पाहिजे यासाठी मेहनत करावी जिद्दीने शिकावे व आपले ध्येय निश्चित करावे असे मार्गदर्शन मॅनेजर प्रीतम थोरात यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात प्रचंड स्पर्धा आहे त्यात टिकण्यासाठी आपण प्रयत्न परिश्रम व निष्ठेने मन लावून अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एच जी पवार, दहावीचे वर्गशिक्षक बालाजी गवाले, डी एम काहलेकर एस एच शेख ,एस ई पवार, बँकेचे धम्मा ढवळे, आर आर पिठ्ठलवाड, व्ही एस गुद्धे, हरिहर धुतमल, राहुल पारेकर,श्रीमती एस एम।आढाव मीना कळकेकर, जामगे, श्रीमती शेडगे, खरात याची उपस्थिती होती.दहावी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वर्ग शिक्षक बालाजी गवाले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला केले संचलन एस एच शेख यांनी संचलन केले
