किनवट, परमेश्वर पेशवे| सोनपेठ जलधरा मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री सत्यनारायण महाराज गणपत खुडे यांचे आज दिनांक 3 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. परम पूज्य सत्यनारायण महाराज यांचे किनवट माहूर तालुक्यामध्ये हजारो भक्त गण होते.


ते जलधरा येथील डॉक्टर चांगदेव खुडे यांचे वडील असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौ. रंगुबाई चांगदेव खुडे यांचे ते सासरे आहेत. त्यांच्या पश्चात शिक्षण क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत काम करणारी कर्मचारी असलेले त्यांना चार नात जावई चार नाती दोन नातू व दोन सुना असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहेत.


परम पूज्य सत्यनारायण महाराज यांचा अंत्यविधी आज सायंकाळी चार वाजता जलधरा येथील महादेव मंदिराच्या परिसरामध्ये होणार असून पंचक्रोशीतील हजारो भक्तगण या अंत्यविधीस मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत. परमपूज्य महाराजांच्या देवाज्ञांनी परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
