नवीन नांदेड| नांदेड येथील ८ जुलै रोजी आयोजित मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीत नवीन नांदेड सह ग्रामीण भागातील अनेक गावातील सकल समाज बांधवसह ,माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत संरपच,पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी,जेष्ठ नागरीक, युवक, महिला, यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा यासह अनेक घोषणा देत ऊपलब्ध असलेल्या वाहनांसह, दुचाकी वरून नांदेड शहरात प्रवेश केला.
नांदेड शहरात आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नांदेड दक्षिण हद्दीत असलेल्या विष्णुपूरी, वाजेगाव,धनेगाव, तुप्पा, कांकाडी,भायेगाव,बळीरामपुर, खुपसरवाडी,माकर्ड, गोपाळचावडी यासह ग्रामीण भागातील अनेक गावातून सकल मराठा समाज यांच्या वतीने केलेल्या आवाहन प्रतिसाद देत उपलब्ध असलेल्या वाहनाने मोठया प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते.
धनेगाव येथे जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, सरपंच पिंटू पाटील शिंदे, तर बाभुळगाव येथे सरपंच पुंडलिक मस्के, कांकाडी येथे माजी सरपंच सुनिल बागल,तुप्पा चिमणाजी पाटील,सरपंच यन्नावार, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पवार, बबन पाटील कदम, माजी सरपंच शिवकांत कदम, गजानन कदम,भायेगाव सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, उपसरपंच बालाजी कोल्हे,मारकड सरपंच आकाश पाटील येवले, बालाजी कदम, कामाजी कदम, डेरला, भनगी कल्हाळ, व पांगरी सरपंच हणमंत घोगरे, वांगी सरपंच दता जाधव पाटील, पुणे गाव, वडगाव, नागापूर, वाडी पुयड, पिंपळगाव मिश्री, बोढारं सह विष्णुपूरी ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी.
यांच्यासह मनपा हद्दीत असलेल्या जुना कौठा,नवीन कौठा,असदवन, असरजन,वाघाळा ,वसरणी यासह सिडको हडको परिसरातील माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,माजी नगरसेवक राजु पाटील काळे,संजय पाटील घोगरे, यांच्यासह आजी माजी नगरसेविका यांच्या सह सामाजिक संघटना व अनेक गावातील पदाधिकारी व युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते. ग्रामीण व शहरी भागातील सकल समाज युवकांनी मराठा सेवक ही भूमिका बजावली व समाज बांधवांना मार्गदर्शन केले.