हिंगोली| अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाची राष्ट्रीय स्तरावरील बैठक दिनांक 21 जुलै 2024 रोजी चेन्नई येथे यशस्वीपणे संपन्न झाली असून, ह्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे प्रतिनिधी रामभाऊ पांचाळ, उपाध्यक्ष अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ रामदास शिराळे हाई लेवल कमेटी अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व महिला प्रतिनिधी श्रीमती शिला पेंडेकर व इतर कर्मचारी पदाधिकारी वर्गानी प्रतिनिधीत्व केले.
शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या जागेवर पुर्वी प्रमाणे वारसा हक्क देण्यात यावा. कर्मचारीच्या एका पाल्यास पुर्वी प्रमाणे शासन सेवेत सामावून घेण्यात यावे. जुनी अनुकंपा योजना लागू करण्यात यावी. चतुर्थ श्रेणी रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने वा बाह्य स्त्रोताद्वारे न भरता सरळसेवेने शासनामार्फत भरण्यात यावी. अनुकंपा तत्त्वावरील जागा भरण्यात याव्यात. अनुकंपा भरती विनाअट करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, वैद्यकीय आजाराने अनफिट कर्मचारी यांच्या पाल्यास नौकरीत समाविष्ट करण्यात यावे.
शासनाच्या काही खात्यामध्ये वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे या व इतर मागण्यांचे ठराव करण्यात आला. या मागण्यांसाठी केंद्र सरकारला डिसेंबर 2024 या कालावधीत जंतर मंतर दिल्ली येथे अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. ह्यात पुर्ण राज्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी या मोर्चात सहभागी होतील असे अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.