नांदेड। जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील मांडणी या गावातील एक चळवळीतील तरुण तिरुपती उर्फ किरण लांडगे या युवकाने मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे, शासन जागा भरत नाही, जाहिरात काढली तर भरती करून घेत नाही आणि केलीच भरती तर नियुक्ती पत्र देत नाही अशा अतिशय वस्तूतिथी आणि बोलक्या शब्दात चिट्टी लिहून अतिशय उद्विगन भावनेतून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
मराठ्यांच्या लेकरांचे सर्वात जास्त मुडदे पाडणारं सरकार म्हणुन तुमची नोंद हो आहे, थोड्या तरी लाजा बाळगा….. एका कॅबिनेट मध्ये सुटणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा शेकडो बळी घेऊन सुद्धा तुम्ही सोडवत नाहीत याचा अर्थ मराठ्यांनी काय कारायच असा सवाल मराठा बांधव उपेक्षित करत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांडणी या गावातील तिरुपती उर्फ किरण लांडगे या युवकाने मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे बोलक्या शब्दात चिट्टी लिहून अतिशय उद्विगन भावनेतून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे पुन्हा एक मराठा समाजच्या युवकाचा बळी शासनाच्या नाकर्तेपणामुळे गेला आहे.