ताणतणाव, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ग्रामीण रूग्णालय भोकर येथे संपन्न-NNL

भोकर। भोकर ग्रामीण रुग्णालय येथे दि.२०/१२/२०२२ रोजी मंगळवार या दिवशी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मानसिक आरोग्य विभाग नांदेड यांच्या मार्फत राबविण्यात आले. शिबीराचे प्रास्ताविक डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी केले.

IMG 20221220 WA0029 ताणतणाव, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ग्रामीण रूग्णालय भोकर येथे संपन्न-NNLया शिबीरामध्ये प्रामुख्याने मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंधात्मक कार्यक्रम, व्यसन समस्या व तसेच योग विषयक माहिती देऊन ६० रुग्णांची तपासणी केली व सल्ला दिला. याव्दारे संबंधित रूग्ण व जनसामान्यांना त्यांच्या आरोग्य विषयक अडचणी विषयी बहुमोल मार्गदर्शन व अनेक मनोरोग वर उपचार डॉ शाहू शिराढोणकर मानसोपचार तज्ञ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी केले.

नांदेड येथील वंदना कसपटे समुपदेशक, अरूण वाघमारे वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता, ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे, डॉ.नितीन कळसकर, डॉ आर्शिया शेख, डॉ.सागर रेड्डी,डॉ.राजाराम कोळेकर, सत्यजीत टिप्रेसवार, मनोज पांचाळ, गंगामोहन शिंदे, अत्रिनंदन पांचाळ, संजय देशमुख, साबेर पाशा, संदिप ठाकूर, पांडुरंग तम्मलवाड, श्रीमती भालेराव, रेणुका भिसे ग्रामीण रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!