नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी देयके ३१ डिसेंबर आत भरून मनपाला सहकार्य करावे , यानंतर शास्ती माफी योजनेचा लाभ मिळणार नाही व जप्ती कार्यवाही करण्यात येईल असे उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी सांगितले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी डॉ.पंजाबराव खानसोळे हे रूजू झाल्यानंतर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे १६ डिसेंबर रोजी भेट दिली व मालमत्ता कर आढावा बैठक घेतल्या नंतर कार्यालय येथील प्रलंबित असलेल्या प्रश्न संदर्भात चर्चा केली, यावेळी सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त डॉ रईसौधदीन, सदाशिव पंतगे, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे वसुली कर निरीक्षक सुधीर बैस, सुदाम थोरात यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी कार्यालय येथे आँनलाईन कक्ष, पाणीपुरवठा देयके,टेबल फर्निचर साहित्य यासह कार्यालयातील रिक्त असलेली पदे कार्यालय संदर्भात व प्लास्टिक जप्ती मोहीम, स्वच्छता यासह विविध प्रश्नांवर चर्चा करून आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्याशी लवकरच चर्चा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.व मालमत्ता करा सबंधी कर निरीक्षक व वसुली लिपीक यांना मार्गदर्शन करून वसुली संदर्भात आढावा बैठक घेऊन मालमत्ता कर न भरणाऱ्या संबंधित विरूद्ध जप्ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
मालमत्ता कर पोटी मालमत्ता धारकांनी मालमत्ता जप्ती टाळुन मनपा प्रशासन सहकार्य करावे व ३१ डिसेंबर पर्यंत शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.