अर्धापूर| आज दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर मालेगाव ता. अर्धापूर जिल्हा नांदेड येथे श्री गुरुगोविंद सिंह जी स्मृती जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे सर , मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून शंभर दिवसीय टीबीरुग्ण शोध मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी संशयित रुग्ण, टीबी रुग्ण संपर्कातील व्यक्तींना व इतर उपस्थित नागरिकांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई सर यांनी टीबी म्हणजेच क्षयरोग या आजाराची कारणे, उपचारपद्धती, आजाराविषयी असणारे गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. राजाभाऊ बुट्टे सर यांनी टीबी मुक्त भारत व टीबी रुग्ण शोध मोहिमे मध्ये आरोग्य कर्मचारी व विशेषतः ग्रामपातळीवरील आशांचे योगदान व महत्त्व विशद करून त्यांना प्रोत्साहित केले .
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी मा.डॉ. श्याम सावंत सर व सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक सोनवणे सर यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे सविस्तरपणे सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्षय रुग्णांना फूड बास्केट देण्यात आले तसेच उपस्थित क्षय संशयित रुग्णांना एक्सरे तपासणी करता अर्धापूर येथे संदर्भित करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मा. डॉ.जाधव मॅडम, अरुण गादगे, थोरात सर, कृष्णा चौधरी, आदिनाथ साखरे व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अर्धापूर येथील कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी ,कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.