हिमायतनगर, अनिल मादसवार। हदगाव -हिमायतनगर विधानसभा निवडणुकीसाठी छाननी अंती ६३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या दि.४ नोव्हेबर रोजी शेवटच्या दिवशी ३९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघे घेतल्याने आता २४ उमेदवार हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे हातगाव विधानसभेची निवडणूक आता काँग्रेस, शिवसेना शिंदेगट, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती, स्वराज्य पक्ष यांच्यात होणार असून निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराचे पारडे जड होते हे मतदार ठरविणार आहेत
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवारात माधवराव निवृत्तीराव पवार इंडियन नॅशनल कॉग्रेस, संभाराव उर्फ बाबुराव गुणाजीराव कदम शिवसेना, गणेश देवराव राऊत बहुजन समाज पार्टी,दिलीप आला राठोड वंचित बहुजन आघाडी,विलास नारायण सावते आझाद समाज पार्टी (कांशीराम),माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,बापूराव रामजी वाकोडे राष्ट्रीय समाज पक्ष,अनिल दिगंबर कदम प्रहार जनशक्ती पक्ष,विजयकुमार सोपानराव भरणे अपक्ष,विश्वनाथ भाऊराव फळेगावकर अपक्ष, प्रकाश विठ्ठलराव घून्नर अपक्ष,श्रीनिवास वैजनाथ पोतदार अपक्ष,गजानन बापूराव काळे अपक्ष,दिलीप उकडंराव सोनाले अपक्ष, शेख अहेमद शेख उमर अपक्ष,गंगाधर रामराव सावते अपक्ष,लता माधवराव फाळके अपक्ष,माधव मोतीराम पवार अपक्ष,गौतम सटवाजी डोनेराव अपक्ष, दिलीप ग्यानोबा धोपटे अपक्ष,राजू शेषेराव वानखेडे अपक्ष,आनंद होणाजी तिरमिडे अपक्ष,अभिजीत विठ्ठलराव देवसरकर अपक्ष, प्रा.डॉ.अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर अपक्ष यांचा समावेश आहे.
आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याऱ्या उमेदवारात माजी खा.सुभाष वानखेडे, डॉ.रेखाताई दतात्रय चव्हाण, शेख जाकेर शेख महुमद चाऊस,अजित खान मन्सूर खान पठाण,अन्वरखान नुरुद्दीन खान, अब्दूल समद खान हाजी जलाल,अभिजीत गोदाजीराव मुळे,अशोक पांडूरंग राठोड,उत्तम रामा गायकवाड,उद्घव दाजीबाराव देशमुख सुर्यवंशी, ओमकार माधवराव हंडेवार,करण उत्तमराव गायकवाड, गजानन आनंदराव शिंदे,गणपत प्रकाशराव पवार,तुकाराम रामजी चव्हाण,दत्तत्रय पांहूरंग आनंतवार, दिगंबर रामराव सुर्यवंशी,दिनेश विजय श्रीरामजवार,दिनेश विनायक रावते,देविदास नागनाथ स्वामी, निळकंठ मुकिंद कल्याणकर,पांडूरंग दावजी दुधाडे,प्रमोद राजाराम वानखेडे,
बाबुराव मुनेश्वर, बालाजी परसराम वाघमारे,बालाजी भगवान पऊळ,मनोज मधुकरराव कदम, अॅड. मारोतराव कान्होबाराव हूके पाटील, मीर मसरत अली मीर नाझीम आली,रमाकांत दत्तात्रय शिंदे,रमेश माधवराव नरवाडे, राजू कोंडबा राऊत, अॅड.रामदास शिवराम डवरे, वैशाली मारोतराव हूके पाटील, सरोज नंदकिशोर देशमुख, सुनिता माधव देवसरकर, सुभाष मारोतराव जाधव,अॅड संतोष उत्तमराव टिकोरे,ज्ञानेश्वर कोंडबाराव गुध्दटवार यांचा समावेश आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा नांदे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर यांनी कळविले असल्याचे मीडिया कक्षातून ए.एम. तामसकर, अनिल दस्तूरकर यांनी कळविले आहे.