नांदेड। बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते, त्यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना शक्तीबल आणि प्रेरणा देते असे प्रतिपादन बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशन चे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांनी केले.
1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे आलेला आहे. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडले. संत बाबा बलविंदरसिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती. इंटरनॅशनल फाऊंडेशन ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अश्विनी बावा यांची विशेष उपस्थित होती.
यावेळी संत बाबा बलविंदरसिंघ जी,नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,अमनदीपसिंग,कांचन बावा, सुशीलकुमार शीला, अश्विनी बावा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संरक्षक मलकीतसिंग दाखा आणि हरियाणा फाऊंडेशनचे अध्यक्ष उमरावसिंग छीना, सरचिटणीस गुलजिंदरसिंग लुहारा, अध्यक्ष फाऊंडेशन महाराष्ट्र अमनदीपसिंग,बलदेव बावा, मनजीत हंब्रा, बिरिंदरसिंग बिल्लू यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा लंगर साहिब येथे दिवाण सजवून ३१६ वा ऐतिहासिक मिलाप दिन साजरा करण्यात आला. नांदेड ते चपरचिडी हा बाबा बंदासिंघ बहादूर रस्ता तयार करावा. भारत सरकारने बाबा बंदासिंघ बहादूर यांच्या नावाने पंजाबमधून जलद ट्रेन चालवावी अशी मागणी बाबा बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार बावा यांनी केली आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक सुशीलकुमार शीला,तरलोचनसिंह बिलासपूर,कांचन बावा (अध्यक्ष बैरागी महामंडल पंजाब), विमेन विंग, संत सतविंदर सिंह हिरा, संजय ठाकूर, दीपक मोरिया, राजू,अमनदीप बावा, सुरिंदर कौर बावा, रजनी बावा, गीता बावा, पूजा बावा, रागनी बावा, अर्जुन बावा, मनजोत बावा, करफुल दास उदासी, ईशान उदासी, सुवर्ण कौर सगू, प्रदीप सगू सरपंच, बलजिंदर कौर, जसविंदर कौर, सर कौर, निर्मल सिंह लापारण, बेअंत सिंह बिलासपूर, सुशील कुमार शीला सामाजिक कार्यकर्ता, रणजीत सिंह साहनेवाल, साधू राम भट्टमाजरा, दयाल सिंग घुरानी कलान, कॅप्टन हरबंससिंग ग्यासपुरा, मनोहरसिंग गिल, गुरजिंदर सिंग लोहारा, जस्सा सिंग धुडिके, दविंदर सिंग लापारण, कॅप्टन बलवीरसिंग फिरोजपूर, जसवंत सिंह, जसपाल सिंग, बलवीरसिंग कलेर, अशोक खेरा, रणजोतसिंग सरपंच, मेवासिंग गिल नंबरदार, ज्ञानी अमरसिंग, डॉ. जगबीर सिंग गिल, डॉ. कुलदीप सिंह गिल, डॉ. दविंदर सिंग लुहारा, मनजीत सिंग, कमलजीत सिंग घारियाल, गुरकीरत सिंग देवगण, जसदीप सिंग दीपा, मनजीत सिंग कॉन्ट्रॅक्टर, स्वर्णसिंग, रिटायर. पोलिस निरीक्षक बलविंदर सिंग, हरविंदर सिंग, करनैल सिंग आदी उपस्थित होते.