नांदेड। गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य व माजी नगरसेवक स. बरियामसिंघ राजासिंघ नवाब यांचे छत्रपति संभाजी नगर येथे रविवार, दि. 1 सेप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. ते माजी नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब (डिंपल सिंग), सामाजिक कार्यकर्ता स. बलबीरसिंघ नवाब आणि गुलबीरसिंघ नवाब यांचे वडील होत.
शेवटच्या क्षणी त्यांचे वय 77 वर्षें होते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. त्यांच्या निधानाने शीख समाजात शोक व्याप्त झाले आहे. त्यांनी अनेक वर्षें गुरुद्वारा बोर्ड सदस्य आणि व्यवस्थापन समिति सदस्य म्हणून काम पाहिले. ते बिदर येथील गुरुद्वारा नानक झिरा साहेब ट्रस्ट मध्ये ही आजीवन सदस्य तथा गवरनिंग कौंसिलचे सदस्य होते.
त्यांच्या मागे कुटुंबात तीन मुलं, सात मुलीं, सुनं, नाटवंड, जवाई, नात असा मोठा परिवार शोकाकुल झाला आहे. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांची अंतयात्रा त्यांचे राहते घर चिखलवाडी येथून निघेल. पश्च्यात नगीनघाट शमशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती पारिवारिक सूत्रांनी दिली आहे.