हिमायतनगर। गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष व हिमायतनगर गोल्ला गोलेवार समाज संघटणा यांच्या मार्फत दि.31रोजी गोल्ला गोलेवार समाज बांधव बाबाराव जरगेवाड व अभिषेक बकेवाड यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन चालू आहेत. याच ओबीसी आंदोलनात हिमायतनगर तालुक्यातील गोल्ला गोलेवार समाज बांधव युवा, तरूण तडफदार,कुशल संघटक व नैतृव गून संपन्न असणारे तरूण बाबाराव जरगेवाड हे हिमायतनगर तालुका ओबीसी अध्यक्ष असुन यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तालुक्यात अनेक ओबीसी आंदोलन केले आहे.
हिमायतनगर तालुक्याच्या ईतिहासात ओबीसी संघटणेच्या माध्यमातून, ओबीसी आरक्षणासाठी हिमायतनगर शहर बंद करणारे बाबाराव जरगेवाड हे एकमेव ओबीसी संघटनेचे अध्यक्ष ठरले आहेत. भोकर येथे ओबीसी योद्धे लक्ष्मनजी हाक्के साहेब यांच्या सभेला नांदेड जिल्ह्यांतून हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी बांधव हे सर्वाधिक संख्येने सहभागी झाले होते. यांचे मूख्ये कारण म्हणजे हिमायतनगर तालुक्यात ओबीसी संघटण हे अत्यंत उत्कृष्ट आसल्यांची पोच पावती आहे.हेच या ठिकाणी सिध्द होत असून
हाके साहेबांच्या रँलीतील हिमायतनगर ओबीसी संघटनेने तयार केलेले छोटे बंँनर हे संपूर्ण रँलीचे आकर्षण ठरत होते.अशा भावना गोल्ला गोलेवार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भुमना आकेमवाड यांनी बोलतांना आपल्या भावणा व्यक्त केल्या आहेत.
ते बोलतांना गोल्ला गोलेवार समाजातील युवकांनी अनेक क्षेत्रांत उतरावे आम्ही त्यांना वेळोवेळी लागेल तशी मदत करू आसा विश्वास त्यांनी दिला आहे. अत्यंत कमी वयात व आपल्या परीस्थितीचा सामना करत हिमायतनगर येथील यूवा तरुण अभिषेक बकेवाड यांनी हिमायतनगर तालुक्यात गोल्ला गोलेवार समाज संघटणेच अतिशय उत्कृष्ट संघटण तयार केल्या बद्दल त्यांचाही सत्कार गोल्ला गोलेवार समाज प्रदेश अध्यक्ष भुमना आकेमवाड यांनी केला आहे.
तसेच प्रदेश अध्यक्ष बोलतांना आपल्या समाजातील युवकांसाठी कोठलाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून बचतगटाची संकल्पना तयार करून,अनेक यूवकांना कर्ज देण्याची योजना आखली आहे. आपल्या जास्तीत जास्त समाज बांधवांनी या बचतगटात सामिल ह्वावे आशे आव्हान गोल्ला गोलेवार समाज संघटना प्रदेश अध्यक्ष भुमना आकेमवाड यांनी, हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात गोल्ला गोलेवार समाज बांधवांशी संवाद साधताना केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे गंगाधर बासेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबाराव जरगेवाड यांनी मानले आहे .
यावेळी गोल्ला गोलेवार समाज संघटना प्रदेश अध्यक्ष भुमना आकेमवाड, पिंटू गूरजी रूद्रवाड,तूकाराम कैलवाड, अशोक कासराळीकर, गंगाधर बकेवाड,विठल दासेमवाड, हिमायतनगर गोल्ला गोलेवार समाज संघटना ता.अध्यक्ष सुभाष शिलेवाड, शाम जकलवाड ता. उपाध्यक्ष,राजु चिकनेपवाड ता.उपाध्यक्ष, गंगाधर बासेवाड ता. कोषाध्यक्ष,नारायन कोरेवाड ता.कार्याध्यक्ष, सुरज चितलवाड ता .प्रसिधी प्रमुख,साई कपलवाड ता.युवा अध्यक्ष,संजय काईतवाड, प्रकाश भदेवाड,शंकर भैरेवाड, साईनाथ आनमवाड, गणेश घोसलवाड, मधूकर मूरगूलवाड, कृष्णा आंबेपवाड, दत्तात्रेय चितलवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.