किनवट, परमेश्वर पेशवे| गोंडजेवली या नाल्याला अचानक पूर आल्याने या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पापन्ना देवकर हा वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेला.. मात्र “वेळ आली पण काळ आला नव्हता” यांचे प्रत्यय अक्षरक्षा पाहायला मिळाले.
या पुराच्या पाण्यामध्ये हा वयोवृद्ध व्यक्ती अडकला आणि उंच गोट्याचा सहारा घेत त्या गोट्यावर थांबला लोकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने या पुरात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात येथील नागरिकांना मोठे यश आले आहे. अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजेवली पुलावर 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी पावणेदोन च्या सुमारास घडली आहे.
किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथील नागरिकांनी या गोड जेवली पुलाची उंची वाढवून द्यावी अशी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली. या पुलाला तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन विटणकर. माजी खासदार हेमंत पाटील. तत्कालीन तहसीलदार मृणाल जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली होती मात्र अद्याप पर्यंत या पुलाच्या बांधकाम उंचीसाठी अद्याप पर्यंत मंजुरी मिळाली नाही. हा पुल आप्पारापेठ वासियांसाठी कायमस्वरूपी धोकादायक असल्याने अशा घटना अनेक वेळा या ठिकाणी घडल्या आहेत.
आता तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गोंड जेवली पुलाची उंची वाढवून नवीन बांधकामास मंजुरी द्यावी अशी मागणी येथील आता नागरिकांनी केली आहे. शिवनी आप्पारावपेठ इस्लापूर या भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने गोंड जेवली या नाल्याला अचानक पुर आला आणि या पुराच्या पाण्यात पापंना नागांना देवकर वय 70 वर्ष राहणार आप्पारावपेठ हा व्यक्ती गोंड जेवली नाक्याहून अपरापेटकडे येत असताना अचानक गोंड जेवली नाल्याला पूर आल्याने पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला मात्र दैव बलवंतर म्हणून हा व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये मध्यभागी एका गोट्याचा सहारा घेत अडकला लोकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने या व्यक्तीला बाहेर काढण्यात मोठे यश आले आहे. यावेळी अप्पारावपेठ येथील मजीद मतीन मोमीन, कावूड भूमेष पोषटी, मोलीसाब, अहमद जमीर शेख यांनी मदत केली आहे.