नवीन नांदेड| मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नांदेड येथे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मंजूर केलेल्या कृषी विद्यापीठ येथे बि.एस.सी,अग्री साठी नव्याने सुरू झालेल्या प्रवेश मध्ये प्रथम विशेष प्रावीण्य यादीत कुं. शितल सतिश मोरे यांच्यी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड ऊतर आ.बालाजीराव कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुरावा मुळे नांदेड येथे नव्याने कृषी विद्यापीठ झाले असुन या ठिकाणी चालू वर्षापासून ६० विधार्थी संख्या असलेल्या या कोर्सला मान्यता मिळाली असून चालू वर्षी झालेल्या प्रवेश पात्र मध्ये माजी कृषी अधिकारी बि. आर. मोरे यांच्यी नात कुं.शितल सतिश मोरे ही पहिल्याच यादी मध्ये विशेष पात्र झाली आहे.
आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलेल्या पाठपुरावा व मुख्यमंत्री यांनी सदरील मागणी मान्य करून चालू वर्षापासून ६० विधार्थी असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या नवीन स्थापना झालेल्या नांदेड येथे कृषी विघालय नांदेड येथे ६० जागेचा चार वर्षेचा अभ्यासक्रमासाठी पात्र विधार्थी यादी जाहीर झाली आहे, यात सिडको परिसरातील शितल मोरे यांच्यी निवड झाली आहे.या बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून बि.आर.मोरे, कै. विठ्ठलराव मोरे हे कृषी अधिकारी म्हणून कृषी विभागात होते ते सेवानिवृत्त झाले असून नातू आदित्य सतिश मोरे हा कृषी विभागात बि. एस. सी पास झाला असून आता नात शितल सतिश मोरे ही बि. एस. सी साठी पात्र झाल्यामुळे मोरे परिवाराच्या आंनद व्दिगुणित झाला आहे.