हिमायतनगर,अनिल मादसवार| कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष कृत्य व हत्येच्या निषेध करण्यासाठी हिमायतनगर येथील डॉक्टर असोशियनच्या वतीने देशव्यापी बंदमध्ये सहभाग घेतला. येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात काळ्या फिती लावून निषेध करत दिवसभर शहर व तालुक्यातील रुग्णालय उघडणार नाहीत अश्या संदर्भाचे निवेदन पोलीस निरीक्षक अमोल भगत याना दिले आहे. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे व सर्व डॉक्टर महिला – पुरुष मंडळी उपस्थित होती. तर या बंदला केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशन यांनीं पाठींबा दिला आहे.
कोलकता येथील महिला डॉक्टरावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण समाज मन सुन्न झाले आहे. तसेच रुग्णालयावर हल्ला करण्यात आला आणि तोडफोड करण्यात आली. या घटनेचे देशभरात तीव्र फडसाद उमटले असून, घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी देशव्यापी बंद मध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्ण सेवेअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने अतिगंभीर रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी करुन शहरातील कोणत्याही डॉक्टरांना कधीही अडचण आल्यास पूर्णतः सुरक्षा देऊ असे आश्वासन दिले आहे.
यावेळी अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे, डॉ.दिगंबरराव डोंगरगावकर, डॉ.दामोधर राठोड, डॉ.आनंद माने, डॉ. गायकवाड, डॉ.गणेश कदम, डॉ.लखपत्रेवार, डॉ.चव्हाण मैडम, डॉ दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.भिसे, डॉ.रावते, डॉ.ढगे, डॉ.वाळके, तसेच केमिस्ट अँड ड्रगीस्ट मेडिकल असोसिएशनचे शंकर वानखेडे, अमोल पेन्शनवार, आदींसह शहरातील व ग्रामीण भागातील सर्व डॉक्टर व मेडिकल चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.