आर्णी। आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा व परिसरातील विविध समस्या व अडचणी सोडवा रास्त असलेल्या मागन्या दोन दिवसात सोडवा अन्यथा सावळी सदोबा येथून जाणारे सर्व रस्ते बंद करू तसेच गावकऱ्यांच्या सहमती ने संपूर्ण गाव बंद करू असा इशारा सावळी सदोबा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब शिंदे व सदस्य अहेमद तंवर यांनी दिला.
सावळी सदोबा भागातील विद्युत चा प्रश्न , संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रश्न,कापेश्वर येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न, अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांचा प्रश्न, झापरवाडी येथील पांदण रस्त्याचा प्रश्न व आयता येथील गॅस सिलिंडर च्या स्फोटाने मूत्यू पावलेल्या कुटुंबाला शासकीय मदत करन्याचा प्रश्न अशाप्रकारचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिनांक 20 डिसेंबर मंगळवार पासून सुरू केलेल्या उपोषणाला गावातील व परिसरातील अनेक लोकांचा पाठिंबा मिळत आहे.
मुबारक तंवर यांच्या सोबत बालाजी ठाकरे, विनोद जैस्वाल, भिमराव दंडजे,निजाम शाह ,दत्ता लोढे हे आमरण उपोषणाला बसले असून अनेक महिला, पुरूष या उपोषणाला पाठिंबा म्हणून याच मंडपात दिवसभर बसून धरणे आंदोलन करीत आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सावळी सदोबा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच श्री. बाळासाहेब शिंदे , सदस्य अहेमद तंवर यांचेसह अनेक ग्राम पंचायत सदस्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मुबारक तंवर व सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणावर ठोस निर्णय दोन दिवसात निघाला नाही तर सावळी सदोबा येथून जाणारे सर्वच रस्ते बंद करू व गावातील व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन गाव पूर्णतः बंद करू असा आक्रमक पवित्रा नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी घेतला आहे.
या उपोषणाला आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती श्री विजय पाटील राऊत , आर्णी कूषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नुनेश आडे , कूषी वैभव जिनींग फॅक्टरी चे अध्यक्ष बक्षुमहंमद सर्वे, आर्णी कूषी ऊत्पन्न बाजार समितीचे संचालक राजु चव्हाण, वामन नाईक,प्रमोद बनसोड, अविनाश भगत, रविंद्र मनवर, शामराव देवकते, सुदाम जाधव, भुवन मुनेश्वर, आकाश वाघमारे, धोंडबा मेश्राम,भैयालाल जैस्वाल, सुभाष गेडाम,उमेश माने यांच्या सह अनेकांनी भेटी दिल्या.