नांदेड। लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथे थेट जनतेतून संरपचपदासाठी गुरूकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे शामसुंदर माधवराव लोहकरे हे विजयी झाले या पॅनलचे नऊ पैकी आठ ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत.
लोहा तालुक्यातील कांजाळा येथील प्रतिष्ठेचा व अटीतटीच्या लढतीत तिन पॅनल मध्ये निवडणूक झाली यात थेट सरपंच पदासाठी गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे शामसुंदर माधवराव लोहकरे हे विजयी झाले तर सदस्यांसाठी माया कामाजी मरवाळे,वनिता माधव आढाव, सुमनबाई वामनराव लोहकरे,सायराबी इस्माईल साब शेख,महालनबाई गुणाजी पेटे,अनुसयाबाई केशव भोंग , चंद्रकांत संजय लोहकरे,कैलास सखाराम गायकवाड हे उमेदवार विजयी झाले.
तर नऊ जागा पैकी आठ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला तर अपक्ष उमेदवार गणपत शामा जाधव हे विजयी झाले असुन ग्रामस्थांनी जल्लोष व्यक्त करत विजयी उमेदवार यांच्ये स्वागत केले आहे. तर युवा भाजपा नेते प्रविण पाटील चिखलीकर व आंंनद पाटील शिंदे ढाकणीकर , माजी सभापती पंचायत समिती लोहा व पदाधिकारी मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे..