अधार्पूर। तालुक्यातील मालेगाव येथील पत्रकार तथा शिवसेना वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी सुभाशिष कामेवार (वय 35) यांचे दि. 21 डिसेंबर बुधवारी दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे मालेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
सुभाशिष कामेवार यांना बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्याने नांदेडच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पत्रकार आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशी कामेवार यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर दि. 22 डिसेंबर गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर मालेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे.