नांदेड। रेल्वे विभागातील पूर्णा ते अकोला सेक्शन मधील पेनगंगा रेल्वे स्थानक कायमचे बंद करण्यात आले आहे.
दिनांक 18 डिसेंबर, 2022 च्या मध्य रात्री 00.00 वाजे पासून प्रवाशांकरिता कायमचे बंद करण्यात आले आहे. या वेळे पासून या रेल्वे स्थानकावर कोणत्याही रेल्वे गाड्या थांबणार नाहीत. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.