नविन नांदेड। असदवन येथील वस्तीवर जाऊन जय भारत माता सेवा समिती नविन दिल्ली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन महसूल विभाग नांदेडचा वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त शासन आपल्या दारी ऊपकम अंतर्गत भटक्या विमुक्त जातींचा लोकांना राशन कार्डचे वाटप २१ डिसेबंर रोजी तहसिलदार किरण अंबेकर, तलाठी मनोज देवणे, यांच्या हस्ते करण्यात आले.
असदवन येथे गेल्या दहा ते बारा वर्षां पासून स्थायीक झालेल्या जवळपास दहा ते बारा कुटुंब मधील जेष्ठ नागरिक,महिला ,युवक ,बालके आसे जवळपास शंभर जण आहेत,कोरोना काळात महसूल प्रशासनाने या वस्तीवर धान्य उपलब्ध करून दिले होते, अखेर जय भारत माता सेवा समितीचा वतीने दासराव हंबर्डे यांनी तहसीलदार किरण अंबेकर यांच्याशी संपर्क करून राशन कार्ड बाबत चर्चा केली व अखेर राशन कार्ड संबंधी कागदपत्रे सादर करून राशन कार्ड काढले, त्याचे वाटप कार्यक्रम २१ डिसेंबर करण्यात आले.
यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,किरण देशमुख, शिवाजीराजुरकर,संभाजी सोनकांबळे, तिरूपती पाटील घोगरे,सांरग नेरलकर,अँड. प्रभाकर लोखंडे, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार किरण अंबेकर यांनी राशन कार्ड आँनलाईन करून शासनाच्या विविध योजनांचा व धान्याचा लाभ घ्यावा, लोकप्रतिनिधीचा साह्याने शासनस्तरावर संबंधिताचा जागेचा जमीन संदर्भात सकारात्मक भुमिका घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दासराव हंबर्डे यांनी केले यावेळी रामुसिंंग मोहनसिंग चितोडीया,लालुसिंग चितोडीया, रामसिंग चितोडीया ,भगवानसिंग,रतनसिंग, शेरू ठाकूर, गजानन हंबर्डे, शिवानंद हंबर्डे, रवि कल्याणकर, यांच्यासह नागरीकाची ऊपसिथीती होती. यावेळी मिनाबाई चितोडीया, दुर्वाई चितोडीया, भगवतीबाई चितोडीया, राणीबाई चितोडीया,सुशिला चितोडीया, राधाबाई चितोडीया,कामाबाई चितोडीया,यांना राशन कार्ड वाटप केले, यावेळी वस्तीवर भारत माता की जय,वंदे मातरम् घोषणा देऊन वस्तीवर जल्लोष साजरा करण्यात आला.