बिलोली। बिलोली शहरात असलेल्या ऐतिहासिक शहिद नवाब सरफराज खान मस्जिद कला टोंब या राज्य संरक्षित ईमारतीच्या परिसरात पुरातत्व विभागाची कोणतीच परवानगी न घेता या जागेत फंक्शन हाॕल,दुकाने बांधण्यात आली. याची तक्रार केल्यानंतर तहसिल प्रशासनाच्या पंचनामा करण्याचे पञ मंडळ अधिकारी यांना देण्यात आले.याबाबत सदरिल जागेवरील पंचनामा आम्हा सर्व तक्रादाराच्या समोर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली.
येथील ईनामी जागेच्या सर्वे क्रं.५७७,५८० या क्षेञात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाची खिदमत माश जमिनीवर अनाधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले.यासंबंधी वेळोवेळी तक्रार,उपोषण करण्यात आले.एवढे करुनही प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच करण्यात आले नाही.तक्रादारांनी औरंगाबाद च्या पुरातत्व कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांनी बिलोली तहसिल प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.
या भागाचे मंडळअधिका-यांनी सदरिल जागेची प्रत्यक्ष जामोक्यावर जाऊन पाहणी करावी, प्रत्येक अतिक्रमणधारक, दुकानदार यांचे नाव,दुकानाची चतु:सिमा आणि तेथील सध्याची वास्तविक परिस्थिती ई,सविस्तर माहिती घेऊन योग्य पद्धतीने रितसर अहवाल,पंचनामा तयार करुन देण्याची मागणी येथील मुसल्लीयान यांनी केली आहे. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर शेख.मोईन सेठ,एजाज फारुखी,रफिक इनामदार,शेख.सलीम शेख. अहेमद, अब्दुल रशीद खय्यूम,शेख.वाजीद शेख. अब्दुल्ला, रज्जाक मोहिदिनसाब खुरेशी,खय्युम खाजा पटेल, शेख. कौसर बावाजीर,शेख.मुस्तफा अहेमद आदिंचे नाव स्वाक्ष-या आहेत.