नांदेड l सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून परभणी येथील २७ वर्षीय युवक विशाल गरूड यांची व्हायरल हेपेटायटीस म्हणजेच अतिगंभीर कावीळ संसर्गातून मुक्तता करून त्यांना जिवनदान दिले अशी माहिती शनिवार दि.१२ एप्रिल रोजी हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ. दुर्गेश साताळकर यांनी यावेळी दिली.


पुढे त्यांनी सांगितले की व्हायरल विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये विषाणूंचा संसर्ग यकृतामध्ये जाऊन यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहचवून त्याच्या कार्यांवर परिणाम करतात त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होतात सदरील रुग्णाबाबतीत अशाच प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती यात रुग्ण अगदी तरुण वयात डायलिसीसवर गेला होता व लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आली होती त्याचबरोबर तो मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्येही गेला होता परंतु नियोजनबद्ध उपचारांतून व्हायरल हेपेटायटीस यशस्वी उपचार केले.


व्हायरल हेपेटायटीस काय आहे ?यकृत आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करणे, रक्त फिल्टर करणे आणि संसर्गाविरोधात लढणे ही यकृताची कार्ये आहेत. व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंचा संसर्ग जेव्हा यकृतामध्ये होतो तेव्हा यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहोचवू शकतात आणि त्याच्या कार्यावर परिणाम करू शकतात, यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात. यामुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर होऊ शकतात.

हेपेटायटीस लक्षणेःहेपेटायटीस ए आणि ई हे सामान्यतः प्रदूषित खाद्यपदार्थ आणि पाण्यामार्फत मल-मुखावाटे पसरतात. अस्वच्छ भागांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला एकतर काहीच लक्षणे नसतात किंवा कावीळ, पोटदुखी, मळमळ, उलट्या, भूक न लागणे, ताप, सर्वसामान्य अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.

विषाणूजन्य हेपेटायटीसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिबंध –यावर प्रतिबंध म्हणजे नेहमी शुद्ध पाणी प्या, शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवा. तसेच सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे किंवा पर्यायी औषधे घेऊ नयेत. अशा औषधांमुळे यकृताला नुकसान पोहोचू शकते व गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीस (हेपेटायटीस बी आणि सी) मध्ये दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे.
येथे करा संपर्क:यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे