लोहा l लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळयाची मिरवणूक अभूतपूर्व अविस्मरणीय मिरवणूक .. अलोट… शिवभक्तांच्या गर्दीने- आनंदी उत्साही. वातावरण… शिवरायांचा जयघोष ढोलताशांचा ….टाळ मृदंग …अश्वाचा लवाजमा जिवंत देखाव अशा मनवेधक वातावरणात जयंती सोहळा पार पडला.


जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर गेल्या गेल्या वीस वर्षा पासून लोहयात छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते .युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात ११ रोजी बुधवारी दुपारी दोन वाजता जूना लोहा येथून सुरुवात झाली.
भव्य-दिव्य मिरवणूक आकर्षक सजावट व आनंदी वातावरणात मिरवणूकीस मुख्य रस्त्याने सुरुवात झाली जूना शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दुपारी दुग्धाभिषेक मंत्रोच्चारात करण्यात आला.

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माजी आरोग्य सभापती प्रविण पाटील चिखलीकर, किरण वद्मवार, आनंदराव पाटील शिंदे, सचिन पाटील चिखलीकर, केशवराव मुकदम, माजी जिल्हा प्रमुख माधव पावडे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कन्हाळे, गणेशराव सावळे, छत्रपती धुनमल, करिम शेख, हरिभाऊ चव्हाण, , बाळाजी पाटील सावरगावकर, साहेबराव काळे सूर्यकांत गायकवाड बी डी जाधव, सचिन मुकदम, दीपक कानवटे, अविनाश पवार यासह खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने तरुण शिवप्रेमी यांनी उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले होते

मिरवणूकीचे थेट’ फेसबुक’ वर लाईव्ह (प्रसारण) होते. भास्कर पाटील पवार, जयंती मंडळाचे अध्यक्ष केशव पवार, अनिल धुतमल , बाळू खोडवे , सूर्यकांत गायकवाड पारडीकर,अविनाश पवार यासह मंडळाने परिश्रम घेतले. छत्रपती शिवरायांची सिंहासनास्त मूर्ती मिरवणूकीचे लक्ष वेधून घेणारी होती. रात्री आतिषबाजी लक्षवेधक व डोळ्यांचे पारणे फेडणारे होती जिल्ह्यात एवढा भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा माध्यातच पार पडला
