नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे “ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्यानुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य शस्त्र बाळगणारे अरोपीतांची माहिती काढुन त्यांचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक इतवारा नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीतील अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. रमेश गायकवाड, सपोउपनि. देविदास बिसाडे, पोहेकॉ./664 मोहन हाक्के, पोना./2556 लक्ष्मण दासरवार, पोना./2117 धिरजकुमार कोमुलवार, पोना./2543 चाऊस, पोकॉ./493 संघरत्न गायकवाड यांना आदेश दिले होते.
दिनांक 31/08/2024 रोजी पो.स्टे. चे डी.बी. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, बाफना टी पॉईन्ट लस्सीचे दुकाणा समोर सार्वजनिक रोडच्या कडेला नांदेड येथे एक इसम त्याचे कमरेला दोन गावठी पिस्टल लावुन थांबलेला आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी तशी माहिती वरिष्ठांना देवुन त्यांचे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे योगेश मारोतीराव पवार वय 19 वर्षे रा. बस्डशेवाळा, ता. हदगाव जि. नांदेड यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कर्मरेला दोन्ही दोन अग्नीशस्ञ (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुस असा एकुण किंमती 50600/- रूपयाचा मुद्देमाल त्याचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीता विरुध्द पो.स्टे. इतवारा नांदेड येथे गु.र.नं. 326/2024 कलम 3/25, 7/25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणें गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि. श्री रमेश गायकवाड हे करत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अविनाश कुमार साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव साहेब, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक साहेब, उप विभाग इतवारा, नांदेड, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे पो.स्टे. इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे. मा. वरिष्ठ अधिकारी यांनी चांगली कामगीरी केली या साठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.