नांदेड। मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. त्यावरून मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000/- रुपयाचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
स्थागुशाचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमीआधारे दिनांक 02/08/2024 रोजी हिंगोली गेट कडे जाणारे रोडवरुन 1) दिलीप अशोक कांबळे वय 25 वर्ष रा. अजनी ता. बिलोली जि. नांदेड 2) अविनाश बाबु भरांडे वय 29 वर्ष रा. अजनी ता. बिलोली जि. नांदेड 3) विधीसंघर्षीत बालक यांचेकडुन पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. 232/2024 कलम 379 भा. दं. वि गुन्हयातील एक हिरो कंपनीची मोटार सायकल किंमती 20000/-रुपयाची हस्तगत करण्यात आले आहे.
तसेच नमुद आरोपीतांकडुन पोलीस ठाणे रामतिर्थ गुरनं. 25/2024 कलम 392, 34 भा द वि गुन्हयातील नगदी 12000/- रुपये व पोलीस ठाणे देगलुर येथे गुरनं. 222/2024 कलम 392, 34 भा द वि गुन्हयातील नगदी 26000/- रुपये असे एकुण 38,000/- रुपये जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीतांना पोलीस ठाणे वजीराबाद येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, सपोउपनि/माधव केंद्रे, पोहेकॉ/रुपेश दासरवार, पोकों/बालाजी यादगीरवाड, ज्वालासिंघ बावरी, मारोती मोरे, चालक हनुमानसिंह ठाकुर, शेख कलीम स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.