लोहा l उपजिल्हा रुग्णालयात वेळेवर रुग्णाला वेद्यकीय सेवा मिळत नाही. डॉक्टर नसतात कर्मचारी येत नाही त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांची हेळसांड होतेय.असा तक्रारी आहेत पंचायत समितीत घरकुल व अन्य योजनेच्या असंख्य तक्रारी आहेत.


वीज विभागाने वेळत डीपी द्यावेत. तसेच मार्केट कमिटीने व्यापाऱ्याना जादा फीस आकारणी करू नये . सर्व विभागाम्याने जनतेची कामे वेळेत करावे तक्रारी येऊ देऊ नका. जनतेची कामे वेळेवर करावीत शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असे निर्देश आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.

लोहा तहसील कार्यालयात आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची बैठक पार पडली . या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी डी. के आडेराघो, माणिकराव मुकदम, हंसराज पाटील बोरगावकर.

बालाजी पाटील मारतळेकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार , सचिन पाटील चिखलीकर , कंधार माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल,जफारोद्दीन बहोद्दीन , दत्ता वाले, करिम शेख, वाबाराव पाटील गवते, पंचशील कांबळे, भास्कर पवार, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ प्रशांत जाधव बांधकाम उपअभियंता (जिप) शिवाजी राठोड सां बां उपविभागाचे उपअभियंता मोहनराव पवार.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ कांबळे, बीईओ सतीश व्यवहारे, विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता एन. के सुतार, शहर अभियंता श्री स्वामी, दुय्यम उपनिबंधक, डहाळे मारुती पाटील ,साहेबराव काळे गुरुजी ,बालाजी पाटील सावरगावकर दिनेश तेल्लवार , समीर कंधार नायब तहसील मोकले यासह सर्व विभाग प्रमुख उपास्थित होते
समन्वय समितीच्या बैठकीत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व विभागाच आढावा घेतला. उपजिल्हा रूग्णालयाच्या तक्रारी खूप असतान डॉक्टर- कर्मचारीवेळेत हॉस्पिटलमध्ये नसतात रुग्ण -नातेवाईकांची हेळसांड होते.
पंचायत समिती च्या कारभारात सुधारणा करा. कामासाठी पैसे घेतात अशा तक्रारी यापूढे येऊ नयेत मार्केट कमिटीने व्यापारी लायसन्स नुतनीकरण फीस वाढवू नये याची दक्षता घ्यावी अन्यथा त्याचे परिणाम वेगळे होतील असा शब्दात समज दिली सर्व विभागाच्या कामाना आढावा घेतला .जनेतीची कामे वेळेवर करा. सर्वसामान्याना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तक्रारी येऊ देवू नका शासकीय योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी करावी असे निर्देश प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.
नगर परिषदेच्या कामाची “दखल”
नगर परिषदेच्या प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे व त्याची टीम चांगली काम करत आहेत प्रलंबित घरकूल योजनेत मुख्याधिकारी लाळगे हे लाभार्थ्यांना अनुदान वाटप वेगाने करत आहेत .कार्यालयीन शिस्त लावण्यात त्यांना यश येते आहे असा शब्दात आमदार चिखलीकर यांनी ” शाबासकी ” दिली शहराच्या कामासाठी निधी उपलब्ध करु देण्यासाठी प्रमुख पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी एकत्रित बसवून प्रस्ताव तयार करावेत निधी उपलब्ध करू असे आश्वासित केले