हिमायतनगर| परभणी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान तथा नासधूस करण्याची संतप्त घटना दिनांक १० डिसेंबर रोजी एका माथेफिरूने केली होती. या घटनेनंतर सर्वत्र याचे तीव्र प्रदिसाद उमटले असून, त्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी बंदची हाक देण्यात अली होती. यास हिमायनगर शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे.
परभणी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान तथा नासधूस करण्याची संतप्त घटना समोर आली आहे. या घटनेमुळे समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतीय संविधानाचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही असे कृत्य महाराष्ट्रा पुन्हा होऊ नये यासाठी शासनाणे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंठकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे. या मागणीसाठी हिमायतनगर शहर गुरुवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. दिवसभर बाजारपेठ बंद असल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला.
लवकरात लवकर आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील समस्त समाज बांधवांनी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यामार्फ शासनाकडे पाठविले आहे. बंददरम्यान येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आभार मानले असून, दिलेल्या निवेदनावर समाज बांधवांसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.