नांदेड| केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने दिनांक 26 जुलै 2025 रोजी वसरणसी जि. नांदेड येथील वसंतराव नाईक महाविदयात कारगील विजय दिवसा निमीत्त विशेष प्रसिध्दीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


सन 1999 मध्ये लडाख मधील कारगील येथे झालेल्या भारत पाकिस्तान युध्दातत विजय मिळवीला या युध्दाचा विजयोस्त व साजरा करण्यासाठी 26 जुलै हा कारगील विजय दिवस म्हतणुन साजरा करण्यात येतो. या निमीत्ताीने वसरणी येथील वसंतराव नाईक महाविदयालयात सकाळी ठिक 11.०० वा विशेष प्रसिध्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे.


या कार्यक्रमाला करगील युध्दास सहभाग असलेल्या सेवानिवृत्ति कॅप्टीन सिताराम हिरामन जाधव तसेच सेवानिवृत्तह नायक तुळशीराम शिवाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थी्ती असणार आहे. त्याच्या प्रत्यक्ष अनुभवांचे कथन देखील होणार आहे. दिनांक 25 रोजी नाईक महाविदयाच्या विदयार्थांच्या सहभागातून कारगील विजय दिवसानिमीत्त पोस्टार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच युवकांमध्ये वाढती व्य्सनाधिनता या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तु देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो चे प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ. व्हि. आर. राठोड आदींनी केले आहे.



