नवीन नांदेड l सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून व गणेशोत्सव काळात ही मुख्य रस्त्यावर व परिसरातील ईतर भागात ही अंधाराचे साम्राज्य पसरले असून तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी मनपा आयुक्त सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे करून सुध्दागणेशोत्सव काळात स्ट्रीट लाईट,पाथवे टुयब लाईट, म्कयुरी लाईट अधापही चालू नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून संबंधित विभागाच्या पदाधिकारी यांच्या वर कार्यवाही करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीत असलेले अनेक रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे वर्ग करण्यात आल्यानंतर सिडको परिसरातील मुख्य रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे वर्ग झाला असल्याने संबधित रस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा ते वसंतराव नाईक महाविद्यालय,संभाजी चौक,राज चौक,क्रांती चौक,छत्रपती शिवाजी महाराज,ज्ञानेश्वर नगर,ढगे रूग्णालय मार्ग गोविंद गार्डन हा रस्ता गेल्याने काही वर्षापूर्वी रस्ता दुतर्फा असलेले स्ट्रीट लाईट काढून सिमेंट काँक्रीटचे रस्ता करण्यात आला पंरतु संबधित गुतेदार यांनी व मनपा विधुत विभाग यांनी या कडे दुर्लक्ष केले,अखेर गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात राहुन दिवस काढले तर काही ठिकाणी वरील मार्गावर अपघात,पादचारी यांना लुटून नेणे, मारामारी अशा अनेक घटना घडल्या,मात्रअंधाराचे साम्राज्य आहे त्या अवस्थेत कायम आहे.
अखेर सामाजिक कार्यकर्ते भि. ना. गायकवाड यांनी मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्यी भेट घेऊन निवेदन देऊन तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी केली तर, शिवसेना ऊबाठा गटाचे ऊप शहरप्रमुख दिपक देशपांडे यांनी ही गणेशोत्सव काळात तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी केली.तर सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने निवेदन दखल देऊन लाईट चालू करण्यात बाबत संबधित विधुत विभाग अभियंता यांना लेखी पत्राद्वारे कळविले पंरतु गणेशोत्सव काळ सात दिवस लोटुनही परिसरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे, मनपा प्रशासनाने तात्काळ लाईट चालू करावी,व संबधीतावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.