नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील श्री विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा जवळपास दहा तास चालला असून यात परिसरातील अनेक भागातील परवानगी व विनापरवानगी सार्वजनिक गणेश मंडळ यांनी सहभाग घेतला. तर मिरवणुक मार्गावर अनेक ठिकाणी विविध प्रतिष्ठान यांच्या कडून व माजी लोकप्रतिनिधी यांच्या कडून अन्नदान, व पिण्याचे पाणी व्यवस्था तर अनेक ठिकाणी गणेश मंडळ पदाधिकारी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रथमच डिजे मुक्त मिरवणुक काढण्यात आली पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.
१७ सप्टेंबर रोजी अंनत चतुर्थी निमित्ताने हडको येथुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून मुख्य मिरवणुकीला ढोल ताशांच्या व फटक्याचा आतिषबाजी मध्ये गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणेने सुरूवात झाली. सिडको परिसरातील सर्वात मोठा ओकांर गणेश मंडळ हडको,शंभू गर्जना हडको, शिवपुत्र गणेश मंडळ, युवा शक्ती,महाराणा प्रताप, विर सावरकर,नटराज, छत्रपती शिवाजी महाराज,श्री गणेश,श्री रिध्दी सिध्दी, यांच्या सह वाघाळा,असदवन, गोपाळ चावडी, शहरी भागातील परवाना व विना परवाना गणेश मंडळ यांनी सहभाग घेतला.
बळीरामपूर येथील जय महाराष्ट्र, जय व्यंकटेश महालक्ष्मी गणेश मंडळ यांनी सजीव देखावा सादर केला,प्रथमच डिजे मुक्त मिरवणुक निघाली, विसर्जन मार्गावर अनेक ठिकाणी विविध प्रतिष्ठान व्यापारी यांनी हडको जनसेवा मित्र मंडळ, सत्यगणपती गणेश मंडळ सिडको,भरत धुत,कृष्णा चाभरेकर, राजेश कदम,राजे महाराजे ईलेक्ट्रॉनिक सिडको, गोकुळ कॉम्पलेक्स व्यापारी प्रतिष्ठान यांच्या वतीने अन्नदान तर उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने भाविक भक्तांना शीत पेय जल वाटप केले.
मिरवणुकीत उपमहापौर विनय पाटील गिरडे, माजी नगरसेवक प्रतिनिधी संजय पाटील घोगरे, उदय देशमुख,सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख,माजी नगरसैविका डॉ.करूणा जमदाडे,ललिता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश रायेवार, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर,सिध्दार्थ गायकवाड, राजु पाटील काळे,माजी नगरसेवक संजय मोरे,अशोक मोरे,यांनी सहभाग नोंदविला.
मिरवणुक दरम्यान पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,उपनिरीक्षक महेश कोरे, ज्ञानेश्वर भोसले,यांच्या सह पोलीस अंमलदार, महिला पोलीस, होमगार्ड यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी व ग्रामीण ५० परवाना तर विना परवाना ९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापना करण्यात आली होती, तर पाच गावात एक गाव एक गणपती सार्वजनिक मंडळ स्थापन करण्यात आली, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी व ग्रामीण भागात शांततेत संपन्न झाले.