नांदेड| येथील प्रतिथयश चार्टेड अंकाऊंटट असलेल्या सिए सुमित बंडेवार यांचा मुलगा श्लोक बंडेवार याने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत यश मिळवित नांदेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अबॅकस शतकानुशतके जुने गणिताचे साधन आहे, जे मोजणीसाठी वापरले जाते. त्यातही प्रामुख्याने, बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकारासाठी वापरले जाते. अबॅकस कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलांच्या मेंदूची कौशल्ये सुधारून मेंदूची शक्ती वाढवणे हा आहे. उच्च शैक्षणिक कामगिरी केवळ अंकगणितातच नाही तर सर्व विषयांमध्येही अबॅकसच्या वापरामुळे प्राप्त झालेले अनेक फायदे आहेत.
अबॅकस हे अंकगणित आकडेमोड सुलभ करून गणिताची भीती दूर करते तसेच ते केवळ गणित सुधारते आणि गणितात रस निर्माण करत नाही तर एकूण शैक्षणिक कौशल्य सुधारण्यास मदत करते आणि दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करते आणि समस्या सोडवण्याची क्षमता आत्मविश्वास वाढवते याबरोबरच मुलाला एकाग्रता, ऐकणे, वेग, अचूक कल्पनाशक्ती, नावीन्य, सर्जनशीलता, आकलन फोटोग्राफिक मेमरी ही कौशल्ये आत्मसात करण्यास सक्षम करते.
श्लोक बंडेवार हा मातृभूमी प्रतिष्ठान नांदेडचे सहसचिव श्री सुधाकरराव बंडेवार यांचा नातु असून त्याने मागील आठवड्यात चेन्नई येथे घेण्यात आलेल्या “राष्ट्री स्तरावरील अबॅकस स्पर्धा परिक्षेत” दैदिप्यमान यश संपादन करुन तो आज सकाळी नांदेडला परत आला त्यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्याला भेटुन त्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा डॉ नागेश कल्याणकर , विक्रांत खेडकर ,अशोक जोशी ,कॅप्टन प्रकाश कस्तुरे ,जगन्नाथ जाधव ,गणेश जगताप ,पाठक साहेब ,मयूर नंदलवार व सुधाकर बंडेवार यांची उपस्थिती होती …