नांदेड| गुरुसेवेसाठी समर्पित आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले सरदार रुपिंदरसिंघ शामपुरा यांचा सचखंड तख्त श्री हजूर साहिब येथे सिंघ साहेब संत बाबा कुलवंत सिंघ जी यांनी सचखंड श्री नांदेड गुरुद्वारा येथे विशेष सन्मान केला. यावेळी प्राईम एशियाचे जोगराज सिंघ काहलों यांचाही सिंग साहेबांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
शामपुरा हे मुलगा हरनूर सिंघ याच्या विवाह सोहळ्यानंतर सद्गुरूंचे आभार मानण्यासाठी आपल्या कुटुंबासह तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे पोहोचले आहेत. गुरुद्वारा बोर्ड तख्त श्री हजूर साहिब यांच्याकडूनही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सिंघ साहेब ज्ञानी कुलवंत सिंघ जी म्हणाले की, गुरु घराच्या सेवेसाठी समर्पित कुटुंबांचा नेहमीच आदर केला जातो. ते म्हणाले की, श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या श्रद्धेनुसार जगताना गुरुघराची सेवा करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे.
तख्त श्री सचखंड श्री हरजू साहिब येथे मिळालेल्या सन्मानाबद्दल गुरु साहिबजींचे आभार मानत, सामाजिक कार्यकर्ते आणि नानक साई फाऊंडेशनचे मुख्य संरक्षक रुपिंदर सिंघ शामपुरा म्हणाले की, गुरु घरातून मिळालेल्या या सन्मानाबद्दल मी गुरु साहिब आणि सिंग साहिबान यांचे आभार मानू इच्छितो. प्राइम एशिया कॅनडाचे विशेष प्रतिनिधी जोगराज सिंग काहलों यांनी तख्त श्री हजूर साहिब बोर्डाच्या व्यवस्थापनाच्या सेवाकार्याचे कौतुक केले. त्यांच्यासोबत हरनूरसिंग देऊ, एकमकौर देऊ,सरगुनकौर देऊ आणि हरजुगजीत कौर देऊ उपस्थित होते.