उस्माननगर l मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला २ मार्च पासून सुरू झाला आहे.हा महीना मुस्लिम बांधव पवित्र महिना मानला जातो. उस्माननगर येथील रिजाकशफ रफिक शेख या सहा – सात वर्षीय चिमुकल्या मुलीने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला.त्याबध्दल रिजाकशफ शेख चा मुस्लिम धर्मातील बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


इस्लाममध्ये कलमा , नमाज , रोजा , जकात , हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे . रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे ( उपवास ) करतात . मोठ्यासह लहान लहान मुल ,मुलीही रमजानचे उपवास करतात. यंदा २ मार्च पासून रमजान महिन्याला सुरूवात झाली. उन्हाची तीव्रता वाढत आहे. एवढ्या तापमानात सात वर्षीय रिजाकशफ रफिक शेख हीने पहिला रोजा पूर्ण केला आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागात सहा सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचे उपवास धरत नाहीत. पण रिजाकशफ रफिक शेख ने पहिला रोजा करण्याचा हट्ट करून तो यशस्वी पणे पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी इफ्तार च्या वेळेवर रिजाकशफ शेखला नविन कपडे , हार घालण्यात आले. पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल गावातील मुस्लिम बांधव, सगे सोयरे यांनी रिजाकशफचे कौतुक केले व अभिनंदन केले.
