नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य आणि सामाजिकशास्त्रे संकुलातील संशोधक विध्यार्थी हणमंत नारायण कंधारकर यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली आहे.
यांनी समाजकार्य या विषयात डॉ.घनश्याम येळणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठवाड्यातील बालगृहातील बालकांच्या हक्क व संवर्धनामध्ये बालगृहांची भूमिका’ या विषयावर संशोधन केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठतील कुलगुरू डॉ.मनोहर चासकर ,
व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, मा.कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.साबळे,अंतरविद्यशाखा अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर सर, विज्ञान अधिष्ठाता डॉ.म.के.पाटील, उप कुलसचिव डॉ.रवि एन.सरोदे , जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ.जि.एस.येळणे, संकुलातील प्रा.डॉ.बी.एस.जाधव, डॉ.प्रमोद लोणारकर, प्रा.एन. बोधगिरे, प्रा.शालिनी कदम, डॉ.नितीन गायकवाड, डॉ.राहुल सरोदे,डॉ.आनंद घोडवाडीकर,डॉ. शंकर जाधव,प्रा.रोहिदास दुधाटे,प्रा.बुद्धभूषण शिरसे आदींनी अभिनंदन केले आहे.