हिमायतनगर| पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे दिघी येथील गावकर्यांना दूषित पाण्याचा सामना करत जीवन यापन करावे लागत आहे. हि बाब हेरून गावातील तरुण युवक राजुभाऊ गायकवाड यांनी थेट मंत्रालय गाठून झालेल्या कामाबद्दल शंका व्यक्त केली आहे. तसेच तात्काळ गावकऱ्यांची होणारी दूषित पाण्याची परवड थांबवावी अशी मागणी निवेदन येऊन केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी या गावातील नागरिकांना पैनगंगा नदीचे अशुद्ध पाणी पिऊन जिवन जगव लागतं आहे. सन 2015/16/17 वर्षी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे कामं देखील करण्यात आले होते. परंतु गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांनी थातुरमातुर बोगस काम करुन रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. आज घडीला नदीचे दुशीत पाणी पिण्याची वेळ संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यामुळे दिघी येथील नागरिकांवर आली आहे.
सदरील पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कामाची चौकशी करून अंदाजपत्रकाप्रमाणे सुरळीत नळयोजना करण्यात यावी. किंवा दिघी गावाला भरघोस निधी मंजूर करुन देऊन पुन्हा एकदा कायमस्वरूपी नळयोजना करून गावातील नागरिकांना पाणी मिळुन द्यावे. या मागणीसाठी दिघी येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व राजुभाऊ गायकवाड यांनी दिनांक 8/08/2024 गुरुवार रोजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंत्रालय मुंबई येथे निवेदन देऊन केली आहे. दिघी येथील रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळुन देण्यासाठी पाठपुरावा करतीच राहणार असल्याचे राजुभाऊ गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले आहे.