नांदेड। नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस दि.20 रोजी साढेतीन तास उशिरा सुटणार असून, धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे. तसेच उशिरा धावणारी तपोवन एक्सप्रेस आणि नारसपूर वेळेवर धावणार आहे. अशी माहिती नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
दिनांक 20 जून 2024 रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हुजूर साहिब नांदेड – अमृतसर सचखंड एक्सप्रेस तीची नियमीत वेळ सकाळी 09:30 वाजता सुटण्या ऐवजी दुपारी 13:00 वाजता सुटेल.
हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL
कोडी आणि रांजणी दरम्यान रेल्वे पटरी चे दुरुस्तीचे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली मराठवाडा एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे, तसेच उशिरा धावणारी तपोवन एक्सप्रेस आणि नारसापूर एक्सप्रेस नियमित वेळा पत्रकानुसार धावणार आहे.
01) गाडी क्रमांक 17688 धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 23, 26, 30 जून, 03, 07, 10, 14, 17, 21, 24, 28, 31, जुलै आणि 04 ऑगस्ट 2024 ला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली गाडी नियमित वेळापत्रका नुसार धावेल.
02) गाडी क्रमांक 17617 मुंबई नांदेड तपोवन एक्स्प्रेस, 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस आणि 12788 / 17232 नगरसोल नरसापूर एक्स्प्रेस या तीन गाड्या दिनांक 22, 25, 29 जून, 02, 06, 09, 13, 16, 20, 23, 27, 30 जुलै रोजी उशिरा धावतील असे कळविण्यात आले होते. या तीनही गाड्या वरील दिनांकास नियमित वेळापत्रका नुसार धावतील.