हिमायतनगर,अनिल मादसवार| काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.१९ ऑगस्ट तिसऱ्या श्रावण सोमवारी भव्य महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो महिला पुरुष भाविक भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला तर अनेक महिला पुरुषांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे.
पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकानच्या जागृत महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित करून जाणतेमध्ये आपला हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी श्रियाळ स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान आणि अन्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर मंदिरात तिसरा सोमवारचा शुभमुहूर्त साधून सकाळी ११ ते दुपारी ०३ या वेळेत भव्य महाप्रसाद व रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते पूजन आणि फीत कापून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड, वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ठ डॉ दिगंबर डोंगरगावकर, डॉक्टर असोशीएनचे अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे, डॉ आनंद माने, डॉ.गणेश कदम, डॉ दिलीप माने, माजी जी.प.सदस्य समद खान, काँग्रेस कार्यकर्ता कैलास राठोड, चेयरमन गणेश शिंदे, अस्लम भांडवाले, आहाद खान, नजीर बाबा, इरफान खान पठाण, हनिफ सर, गणेशराव दिघीकर, मदनराव पाटील, श्री परमेश्वर मंदिर कमेंटचे सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक लताताई पाध्ये, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, किसनराव वानखेडे, प्रसन्न रावते, डॉ गायकवाड, भास्कर चिंतावार, सुभाष वानखेडे, वर्हाड सर, रमेश जोगदंड, रामराव सूर्यवंशी, प्रकाश हंपोलकर, राजू पाटील, शंकर पाटील, आदींसह अनेक मान्यवर, पत्रकार व काँग्रेस, राष्ट्रवादी पाकसाचे कार्यकर्ते, नागरिक महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ श्री व सौ.चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.