नवीन नांदेड़ l मनपाच्या सिडको क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रोडवरील मागील बाजूस असलेल्या शंकरनगर मार्गावर पथदिवे बसवून देण्याची मागणी अभियंता महावितरण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड़ यांनी प्रत्यक्ष भेटून केली आहे.
अभियंता महावितरण यांना दिलेल्या निवेदनात सिडको मुख्य रस्ता व क्षेत्रीय कार्यालय मागील मार्गावर पथदिवे यांची कमतरता असून त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडी अडचणींचा सामना करावा लागतो.
याशिवाय या मार्गावर चोरीच्या घटना वाढल्या असून प्रभागात पथदिवे लवकरात लवकर बसवावे व सिडको मुख्य रस्ता झाल्यानंतर आज पर्यंत या रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले नाहीत , लवकर बसवावेत जेणे करून कोणताही अनुचित प्रकार या मार्गावर घडू नये, असे निवेदनात नमूद केले यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख सूर्यकांत शिंदे ,बालाजी वाघमारे, आनंदा वाघमारे, दीपक गर्दनमारे यांची उपस्थिति होती.