उस्माननगर l येथुन जवळच असलेल्या मौजे कलंबर बु.ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नृसिंह मित्र मंडळाच्या वतीने श्री. नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने राजपुत गल्ली येथे ह.भ.प. भगवान महाराज लहानकर यांचे दि.११ मे २०२५ रविवारी रात्री ९ वा . हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


दि.११ मे रोजी कलंबर बु ता.लोहा येथील राजपुत गल्लीतील श्री नृसिंह मंदिरात सकाळी महापुजा व चार वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरात भाविकांना श्री नृसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा व हरिकिर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नृसिंह मित्र मंडळ राजपुत गल्ली व समस्त कलंबर बु येथील नागरिकांनी केले आहे.




