नांदेड| 4 ऑगस्ट आचार्य बाळकृष्ण जी महाराजांचा जन्मदिवस आहे. भारतभर हा दिवस जडीबुटी दिवस म्हणून साजरी केल्या जातो. आयुर्वेदिक क्षेत्रात आचार्य बाळकृष्णजी महाराज यांनी खूप भरीव काम केले आहे.
योग, स्वदेशी चिकित्सा, स्वदेशी उत्पादने, स्वदेशी औषधी, स्वदेशी यज्ञ पद्धती चिकित्सा, स्वदेशी गोपालन, स्वदेशी वैदिक शिक्षण पद्धती, स्वदेशी खेळ, स्वदेशी विचारधारा, स्वदेशी आहार अशा अनेक क्षेत्रात आचार्यश्रीनी कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना कलयुगाकाचे धन्वंतरी म्हणून संबोधल्या जाते.
अशा सर्वांगीण व्यक्तिमत्व असलेल्या महान विभूतीचे 4 तारखेला जन्मदिवस आहे. त्या अनुषंगाने नांदेड पतंजली योग परिवारातर्फे योग, यज्ञ, जडीबुटी प्रदर्शन, वृक्षारोपण, वनस्पती रोपाचे वाटप असे विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. भाग्यनगर कॉर्नर ठिकाणी सातोनकर बंधू यांचे चितळे एक्सप्रेस तसेच महालक्ष्मी फुड्स सेंटर ठिकाणी भव्य जडीबुटी प्रदर्शनाची सुरुवात 4 तारखेला सकाळी 9.00 ते रात्री 8.00 पर्यंत राहणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्य प्रभारी आदरणीय दिनेशजी राठोड, शंकरजी नागापुरे, दत्तात्रयजी काळे राज्य कार्यकारणी सदस्य संजयजी चाफळे, पुंडलिकजी निर्मळे, पंढरीनाथजी कंठेवाड तसेच नांदेड पतंजली योग परिवाराचे मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. नांदेडकरांनी या संधीचा भरपूर लाभ घ्यावा असे पतंजली योग परिवार नांदेड तर्फे कळविण्यात येत आहे.