कंधार/ नांदेड| महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन शिक्षक दिनाच्या औचित्याने युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्या निमिताने आज दि.10 सप्टेबर रोजी जेष्ट स्वातंत्र सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते कंधार येथिल संपर्क कार्यालयात महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले.
गेल्या 24 वर्षापासुन दिगांबर वाघमारे यांचे शैक्षणिक कार्य चालू आहे. संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एन. केंद्रे, सचिव चेतन भाऊ केंद्रे, माजी नगराध्यक्षा तथा संचालिका अनुराधा केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून कार्य बजावत आहेत. तसेच ते सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत आहेत.
या सर्व कार्याची दखल घेऊन पुणे येथिल युवा महाराष्ट्र फाउंडेशन च्या वतीने दिल्या जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर करण्यात आला होता.आज दि.10 सप्टेंबर रोजी सदर पुरस्काराचे भारतीय टपाल द्वारे कंधार येथे पार्सल मिळताच जेष्ट स्वातंत्र सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते आणि येथिल पत्रकार बांधवाच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वैजनाथराव कुरुडे, जेष्ठ पत्रकार प्रा. डॉ गंगाधर तोगरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग, हिदवी बाणाचे संपादक माधव भालेराव, पत्रकार महमद सिंकदर, निलेश गायकवाड, माणिक बोरकर यांची उपस्थिती होती.